Seminar Topics

www.seminarsonly.com

IEEE Seminar Topics

Navratri Essay in Marathi : Navratri 2020 Pooja, Wishes, Quotes, Colour, Images, Videos


Published on Nov 15, 2020

Navratri Essay in Marathi : Navratri 2020 Pooja, Wishes, Quotes, Colour, Images, Videos

Navratri Essay in Marathi : Navratri 2020 Starts on October 17, Saturday Navrati ends with Saraswati Visarjan on October 23, Friday. The tenth day is Dussehra , which falls on October 25, Sunday.

Sharad Navratri 2020 or Maha Navratri is commonly celebrated during the Indian month of Ashvina that commences from the first day of the lunar fortnight. As per the English calendar, it usually falls in the months of September and October.

The Festival is celebrated for nine nights and devotees pray, take part in the Dandiya Raas and Garba and offer prasad to please Goddess Durga.




Navratri Essay in Marathi

हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते.

कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असतॆ, पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे, किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते. चंपाषष्ठीचे नवरात्र फक्त सहा दिवसांचे असते.

==८/१० दिवसांची नवरात्रे= शारदीय नवरात्र १९६७, २०११, २०१२, या साली ८ दिवसांचे होते, २०३८ सालीही ते आठच दिवसांचे असेल; २००० व २०१६ साली ते दहा दिवसांचे होते.

वासंतिक नवरात्र सन २००० (अष्टमी क्षय), २०१५ (तृतीया क्षय), २०१६ (तृतीया क्षय), २०१७ (प्रतिपदा क्षय) या वर्षी आठ दिवसांचे होते आणि २०१८ (नवमी क्षय), २०२५ (तृतीया क्षय), २०२६ (प्रतिपदा क्षय) या सालीही ते ८ दिवसांचे असेल. २०२९ (द्वितीया वृद्धी) या साली ते १० दिवसांचे असेल.

व्रत- नवरात्र हे एक काम्य व्रत आहे.पुष्कळ घराण्यांत या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.त्यासाठी घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात. तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्तिवाचनपूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात. व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ रहायचे असते. आश्विन शुद्ध नवमीपर्यंत हे व्रत चालते. या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात, अखंड दीप लावतात. घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात. क्वचित होमहवन व बलिदानही करतात. नऊ दिवस रोज कुमारीची पूजा करून तिला भोजन घालतात. शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्थापन करतात.[८]काही कुटुंबात देवीला कडाकण्या बांधण्याची पद्धतही प्रचलित आहे.
देवीची अन्य नवरात्रे याप्रमाणे-
१.पौष शुकल सप्तमी ते पौर्णिमा =शाकंभरी नवरात्र
२.मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी किंवा अष्टमी ते पौर्णिमा =योगेश्वरी अंबेजोगाई नवरात्र
३ .चैत्र शुक्ल सप्तमी ते पौर्णिमा =सप्तशृंगी नवरात्र

देवीची नऊ रूपे

सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।
१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री

अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.

मार्कंडेय पुराणातील देवी माहात्म्यात सांगितले आहे- “ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते.

नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते

जोगवा

जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक भारूड रचले आहे. ते असे-
अनादी निर्गुण प्रगटली भवानी ।
मोह महिषासुर मर्दना लागुनी ॥
त्रिविध तापांची कराया झाडणी ।
भक्तांलागुनी पावसी निर्वाणी ॥
आईचा जोगवा जोगवा मागेन ।
द्वैत सारुनी माळ मी घालीन ॥
हाती बोधाचा झेंडा घेईन ।
भेदरहित वारिसी जाईन ॥
नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा ।
करुनी पीटी मागेन ज्ञानपुत्रा ॥
या भारुडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत.

नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी (महालय), आठव्या दिवसाला महाअष्टमी (दुर्गाष्टमी), आणि नवव्या दिवसाला महानवमी म्हणतात.

Food Eaten During Navratri:

* Fried or boiled potatoes

* Kadhi prepared with kuttu atta and sea salt

* Aloo tikki

* Banana chips

* Makhane ki sabzi

* Fruits and fruit juices

* Sabudana kheer

* Curd

* Lassi

* Kuttu atta roti with kaddu sabzi or aloo sabzi

Dates and Celebrations of Navaratri 2020

According to some Hindu texts such as the Shakta and Vaishnava Puranas, Navaratri theoretically falls twice or four times a year. Of these, the Sharada Navaratri near autumn equinox (September–October) is the most celebrated and the Vasanta Navaratri near spring equinox (March–April) is the next most significant to the culture of the Indian subcontinent. In all cases, Navaratri falls in the bright half of the Hindu lunisolar months. The celebrations vary by region, leaving much to the creativity and preferences of the Hindu.

Sharada Navaratri:

The most celebrated of the four Navaratri, named after Sharada which means autumn. It is observed the lunar month of Ashvin (post-monsoon, September–October). In many regions, the festival falls after the autumn harvest, and in others during harvest.

Vasanta Navaratri:

The second most celebrated, named after vasanta which means spring. It is observed the lunar month of Chaitra (post-winter, March–April). In many regions the festival falls after spring harvest, and in others during harvest.

The other two Navratris are observed regionally or by individuals:

Magha Navaratri :

in Magha (January–February), winter season. The fifth day of this festival is often independently observed as Vasant Panchami or Basant Panchami, the official start of spring in the Hindu tradition wherein goddess Saraswati is revered through arts, music, writing, kite flying. In some regions, the Hindu god of love, Kama is revered.

Ashada Navaratri :

in Ashadha (June–July), the start of the monsoon season.

The Sharada Navaratri commences on the first day (pratipada) of the bright fortnight of the lunar month of Ashvini. The festival is celebrated for nine nights once every year during this month, which typically falls in the Gregorian months of September and October. The exact dates of the festival are determined according to the Hindu lunisolar calendar, and sometimes the festival may be held for a day more or a day less depending on the adjustments for sun and moon movements and the leap year.

The festivities extend beyond goddess Durga and god Rama. Various other goddesses such as Saraswati and Lakshmi, gods such as Ganesha, Kartikeya, Shiva, and Krishna are regionally revered. For example, a notable pan-Hindu tradition during Navaratri is the adoration of Saraswati, the Hindu goddess of knowledge, learning, music, and arts through Ayudha Puja. On this day, which typically falls on the ninth day of Navaratri after the Good has won over Evil through Durga or Rama, peace and knowledge is celebrated. Warriors thank, decorate and worship their weapons, offering prayers to Saraswati. Musicians upkeep their musical instruments, play and pray to them. Farmers, carpenters, smiths, pottery makers, shopkeepers and all sorts of tradespeople similarly decorate and worship their equipment, machinery, and tools of trade. Students visit their teachers, express respect and seek their blessings.This tradition is particularly strong in South India, but is observed elsewhere too.

Summary

Navaratri is celebrated in different ways throughout India.Some fast, others feast. Some revere the same Mother Goddess but different aspects of her, while others revere avatars of Vishnu, particularly of Rama. The Chaitra Navaratri culminates in Rama Navami on the ninth day and the Sharada Navaratri culminates in Durga Puja and Dussehra.

The Rama Navami remembers the birth of Rama, preceded by nine days of Ramayana recital particularly among the Vaishnava temples. In the past, Shakta Hindus used to recite Durga's legends during the Chaitra Navaratri, but this practice around the spring equinox has been declining. For most contemporary Hindus, it is the Navaratri around the autumn equinox that is the major festival and the one observed. To Bengali Hindus and to Shakta Hindus outside of eastern and northeastern states of India, the term Navaratri implies Durga Puja in the warrior goddess aspect of Devi. In other traditions of Hinduism, the term Navaratri implies something else or the celebration of Hindu goddess but in her more peaceful forms such as Saraswati – the Hindu goddess of knowledge, learning, music, and other arts. In Nepal, Navaratri is called Dasain, and is a major annual homecoming and family event that celebrates the bonds between elders and youngsters with Tika Puja, as well as across family and community members


Comment Box is loading comments...